
एक काळ असा होता की, लग्न झालेली मुलगी अनेक दिवस सासरच्या माणसांपुढं मान वर काढायची नाही. बोलताना लाजायची, घाबरायची. अर्थात, यात मोठय़ांच्या आदराचा भाग होता. पण आजचं चित्र वेगळं आहे. आताच्या मुली बिनधास्त आणि स्वतंत्र मताच्या आहेत. त्या आपल्या पद्धतीनं आयुष्य जगतात. भीती बाळगत नाहीत. याचं प्रातिनिधीक उदाहरण म्हणावा असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात हळदीच्या दिवशी मुलगी नवऱयासोबत ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ या लावणीवर दिलखेचक नृत्य करताना दिसतेय. नवराही शिट्टय़ा वाजवत तिला दाद देतोय. पाहुणे मंडळीही हे पाहून चकित झाली आहेत. https://tinyurl.com/3uvay22e या लिंकवर हा व्हिडीओ पाहता येईल.