
1 नोव्हेंबरपासून आता ग्राहकांना आपल्या खात्यासाठी एकच नव्हे तर चार वारसदार जोडता येणार आहेत. यामुळे ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पैसे मिळवता येणार असून कारभारही पारदर्शक राहणार आहे. अर्थमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबाबत सांगितले की, बँकिंग कायदा (दुरुस्ती) अधिनियम नोव्हेंबरपासून लागू होतील. या कायद्यात नॉमिनीबद्दल नवीन नियम आहेत. आता कोणताही बँक ग्राहक आपल्या खात्यासाठी, लॉकरसाठी किंवा सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी जास्तीत जास्त चार नॉमिनी निवडू शकतो.

























































