आंध्रप्रदेशमध्ये बसला आग, 20 जण ठार

आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिह्यात हैदराबाद-बंगळुरू हायवेवर आज एका खासगी बसला पहाटे भीषण आग लागून 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका मोटारसायकलला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कावेरी ट्रव्हल्सची ही बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. त्यावेळी पहाटे ही आग लागली. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. त्यापैकी काही जणांनी खिडकीच्या काचा पह्डून आपला जीव वाचवला. आगीची तीव्रता इतकी होती की, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.