
‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर होऊनही रेल्वे स्थानकाचे नाव जुनेच ठेवले होते. ते तातडीने बदलण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून रेल्वे स्थानकाच्या नामफलकावर ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नवीन नाव झळकले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या फलकांवरील जुने नाव पुसून टाकण्यात आले आहे.
‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ जिह्यांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या निर्णयाला आधी मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते. दोन्ही ठिकाणी याचिका फेटाळण्यात आल्यानंतर नामांतर मार्गी लागले होते. त्यानंतरही रेल्वे स्थानकाचा फलक मात्र बदलला नव्हता.


























































