चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नानाविध उपाय करतो. परंतु अनेकदा खूप पैसा खर्च करूनही हवा तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच चेहरा काळवंडतो तसेच डल दिसतो. प्रदूषण, धूळ, आर्द्रता यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. या सर्व गोष्टींमुळे काही लोकांना पिगमेंटेशन, चेहऱ्यावरील काळे डाग, मुरुमे यासारख्या समस्या देखील येऊ लागतात. व्यस्त जीवनशैलीमुळे महिला या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि त्या हळूहळू वाढू लागतात. वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी महिला महागड्या उत्पादनांचा वापर करतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर केमिकल उत्पादने लावणे टाळत असाल तर स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

दिवाळीनंतर मधुमेही रुग्णांनी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे, जाणून घ्या

मूग डाळ आरोग्यासाठी खूप चांगली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की,  ही डाळ चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते? चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी, मूग डाळीपासून फेस पॅक कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या.

मूग डाळीचा फेस पॅक अशा पद्धतीने बनवा

मूग डाळ

दही

मध

तांदळाचे पीठ

काही पदार्थ हे गरम असतानाच का खायला हवेत, वाचा

फेस पॅक कसा बनवायचा?

फेस पॅक बनवण्यासाठी, मूग डाळ पूर्णपणे धुवा आणि नंतर वाळवा. सुकल्यानंतर मूग डाळ बारीक करा. आता डाळीची ही पावडर तांदळाच्या पिठामध्ये मिसळा. आता एका भांड्यात थोडेसे काढा. नंतर त्यात दही आणि मध मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. फेस पॅक तयार आहे.

आपल्या आहारात राजगिऱ्याचा समावेश करण्याचे फायदे, वाचा

फेस पॅक कसा लावायचा?

फेस पॅक लावण्यासाठी, प्रथम तुमचा चेहरा फेस वॉशने धुवा. आता या फेस पॅकचा पातळ थर थोडासा ओला झालेल्या चेहऱ्यावर लावा. फेस पॅक अर्धवट सुकल्यानंतर हात ओले करा आणि नंतर संपूर्ण फेस पॅक हलक्या हातांनी गोलाकार घासून घ्या. त्यानंतर या पॅकचा दुसरा थर लावावा. किमान 15 मिनिटे तसेच राहू द्या. सुकल्यानंतर, पॅक पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर लावा.