देश विदेश – सीडीएस जनरल अनिल चौहान इंडोनेशियात

हिंदुस्थानचे सीडीएस जनरल अनिल चौहान हे आठ दिवसांच्या इंडोनेशिया दौऱ्यावर पोहोचले. हिंदुस्थान आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी चौहान यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. इंडोनेशिया येथील भारतीय दूतावासांनी या दौऱ्याची माहिती दिली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे जानेवारीत गणराज्य दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चार दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी ब्रम्होसच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही म्हटले होते की, ऑपरेशन सिंदूर नंतर 14 ते 15 देशांनी हिंदुस्थानच्या ब्रम्होसची मागणी केली आहे.

अमेरिकेचे हेलिकॉप्टर लढाऊ विमान क्रॅश

दक्षिण चीनच्या समुद्रात दोन दुर्घटना घडल्या. अमेरिकेच्या नौदलाचे हेलिकॉप्टर आणि एक लढाऊ विमान क्रॅश झाले. या दोन्ही दुर्घटनेत पायलट आणि क्रू मेंबरला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दोन्ही दुर्घटनेचा तपास करण्यासाठी चौकशी समिती बसवली आहे. अमेरिकी नौदलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. नौदलाचे एअरक्राफ्ट पॅरियर यूएसएस निमित्सजवरून नियमित मोहिमेसाठी निघालेले एमएच-60 आर सीहॉक हेलिका@प्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेनंतर अर्ध्या तासाने लढाऊ विमान एफ/ए-18 एफ सुपर हॉर्नेट विमान क्रॅश झाले.

थायलंडच्या राजमाता सीरिकित यांचे निधन

थायलंडच्या राजमाता सीरिकित यांचे निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. बँकॉकच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2012 मध्ये त्यांना स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्या सार्वजनिक जीवनातून जवळपास दूर होत्या. तसेच त्यांचे पती राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे ऑक्टोबर 2016 मध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे थायलंडमध्ये 30 दिवसांपर्यंत राष्ट्रध्वज अर्धा झुकलेला असेल तर सरकारी कर्मचारी एक वर्षापर्यंत शोक व्यक्त करतील. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविरापुल यांनी या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

जम्मूकश्मीरमध्ये पुन्हा दरबार मूव्हसुरू

चार वर्षांनंतर जम्मू-कश्मीरची ऐतिहासिक परंपरा दरबार मूव्ह पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. दरबार मूव्हची सुरुवात महाराजा रणबीर सिंह यांनी 1872 मध्ये केली होती. या परंपरांतर्गत दरवर्षी उन्हाळ्यात श्रीनगरमध्ये आणि हिवाळ्यात जम्मू प्रशासनिक राजधानी बनते. ही परंपरा राज्याची भौगोलिक आणि हवामान परिस्थिती ध्यानात ठेवून सुरू करण्यात आली होती. सरकार दोन्ही क्षेत्रात समानरूपाने पोहोचावे, हा यामागचा उद्देश आहे. ऑगस्ट 2029 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर या व्यवस्थेवर बंदी घातली होती. यानंतर 2021 तत्कालीन उपराज्यपालांनी दरबार मूव्ह कायम बंद करण्याची घोषणा केली होती.

हिंदुस्थानपाकिस्तान सीमेवर दोघांना अटक

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा सीमा सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांनी पाकिस्तानी कारवाई नाकाम केली आहे. जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरच्या बिधीपूर गावात सुरक्षा एजन्सीने संयुक्त मोहीम चालवली, ज्यात दोन संशयित पॅकेट जप्त केले आहे. या पॅकेट्समध्ये अंमली पदार्थ आहे. हे पॅकेट सीमेहून एका ड्रोनच्या माध्यमातून हिंदुस्थानी हद्दीत पाडले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरात शोधमोहीम केली. हे दोन्ही पॅकेट पिवळ्या टेपने बांधलेले होते. हे दोन्ही पॅकेट्स जप्त करण्यात आले होते