यानिक सिनरची जेतेपदांची बावीशी

इटलीचा तरुण टेनिस चॅम्पियन यानिक सिनरने आपल्या झंझावाती फॉर्मला पुढे नेत रविवारी व्हिएना ओपन जिंकत आपल्या कारकीर्दीतील जेतेपदाची बावीशी साकारली. अंतिम सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेववर 3-6, 6-3, 7-5 असा रोमांचक विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही सिनरने दुसऱया सेटमध्ये लय पकडली आणि तिसऱया सेटमध्ये अप्रतिम बॅकहँड विनरसह झ्वेरेवला नमवले. स्कोर 5-5 असताना मिळवलेला निर्णायक ब्रेकच त्याच्या विजयाचा टार्ंनग पॉइंट ठरला. त्यानंतर सर्व्हिस राखत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह सिनरने इनडोअर हार्डकोर्टवर सलग 21 सामने जिंकण्याचा विक्रम केला असून व्हिएना ओपनमधील हे त्याचे सलग दुसरे विजेतेपद आहे. त्याने 2023 मध्येही हीच ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. सामन्यानंतर आनंद व्यक्त करत सिनर म्हणाला, “सुरुवात माझ्यासाठी अवघड होती, पण मी मानसिकदृष्टय़ा मजबूत राहिलो. तिसरा सेट चढ-उतारांनी भरलेला होता, पण शेवटी विजय मिळवणं खूप खास आहे.