
न्या. सूर्य कांत नवे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्र सरकारला केली आहे. न्या. सूर्य कांत हे सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.
न्या. गवई हे 53वे सरन्यायाधीश आहेत. ते 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. 24 नोव्हेंबरला न्या. सूर्य कांत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते 54वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल. ते 27 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील.
वन रँक वन पेंशन
हरियाणातील सामान्य कुटुंबात 10 फेब्रुवारी 1962 रोजी सूर्य कांत यांचा जन्म झाला. 24 मे 2019 रोजी न्या. सूर्य कांत यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लागली. तेव्हापासून अनेक महत्त्वाचे निकाल त्यांनी दिले. संरक्षण दलाच्या वन रँक वन पेंशनवर न्या. सूर्य कांत यांनी शिक्कामोर्तब केले. 370 रद्द करण्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेणाऱया घटनापीठात ते होते.





























































