
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. ताशी 100 किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे किनारपट्टी भागात हाहाकार माजला आहे. अनेक घरे कोसळली, झाडे उन्मळून पडली आहेत.
या चक्रीवादळाचा तडाखा आंध्रसह ओडिशा, तामीळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांना बसला आहे. सुमारे 50 हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवले आहे. 52 विमान उड्डाणे, 120 रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. उद्या, 29 रोजी सकाळी चक्रीवादळ ओडिशात धडकेल, असा अंदाज आहे. रात्री नऊच्या सुमारास आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम किनाऱ्यावर ‘मोंथा’ चक्रीवादळ धडकण्यास सुरुवात झाली. ताशी 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.



























































