
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सूत्र अजून सुरूच असून आज राज्य शासनाने सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांना पर्यटन विभागाचे प्रधान सचिव बनवण्यात आले आहे. पराग जैन नैनुतिया यांना सामान्य प्रशासन विभागातून पाणीपुरवठा तर ई. राघवेंद्र यांना आरोग्य विभागात पाठवण्यात आले आहे.
1999 च्या बॅचचे कुणाल कुमार यांना मुंबईत शिवशाही पुनर्वासन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांची बदली मंत्रालयात सामान्य प्रशासन विभाग सचिव म्हणून करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्रन यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प (पुणे) येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर यशदाच्या उपमहासंचालक पवनित काwर यांची अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.




























































