हिंदुस्थानात आयफोन 17 ची रेकॉर्डब्रेक विक्री, देशभरात ईएमआयवर सर्वाधिक खरेदी

अॅपलने आपली आयफोन 17 नवी सीरिज नुकतीच लाँच केली असून या सीरिजने विक्रीतील सर्व रेका@र्ड मोडले आहेत. आयफोन 17 च्या मॉडेल्सने मागील सर्व सीरिजच्या फोनला मागे टाकत सर्वात जास्त विक्री केली आहे. आयफोन 17 ची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के अधिक झाली आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. आयफोन 17 ने केवळ मुंबई, दिल्ली, चेन्नई यांसारख्या मोठय़ा शहरात आयफोन चाहत्यांना भुरळ घातली नाही तर देशातील छोटय़ा शहरातील चाहत्यानांही चांगलीच भुरळ घातली आहे. देशातील कमी लोकसंख्या असलेल्या गावातही आयफोनची व्रेज पाहायला मिळत आहे. आयफोनच्या किमती 1 ते दीड लाख रुपये असूनही आयफोन खरेदी करत आहे.

हिंदुस्थानातील स्मार्टफोन बाजार गेल्या तीन वर्षांत दबावात आहे, परंतु प्रीमियम स्मार्टफोनची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. महागडे फोन खरेदी करण्यामागे, आकर्षक ईएमआय आणि प्रमोशनल ऑफर्सही कारणीभूत ठरत आहेत. आयफोन 17 ची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. अॅपलने आर्थिक वर्ष 2025 मध्ये हिंदुस्थानात 10 अब्ज डॉलरहून अधिक कमाई केली आहे. याचे एपूण मूल्य 400.4 अब्ज डॉलर आहे. अॅपलचे सीईओ टीम पूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानात लागोपाठ 14 तिमाहीपर्यंत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अॅपलचे युरोप सेगमेंट यात हिंदुस्थान, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशात सप्टेंबर 2025 मध्ये 20.4 टक्के ग्रोथ केली आहे. अवघ्या एका महिन्यात 66 लाख युनिट्सची विक्री केली आहे.

आयफोन 17       82,900 रुपये

आयफोन 17 प्रो   1,34,900 रुपये

आयफोन 17 प्रो मॅक्स       1,39,900 रुपये

आयफोन 17 एअर            1,19,900 रुपये