
हिंदुस्थानातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डेटा हा चीनच्या हातात आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी अटेंडन्स मशीन्स लावण्यात आली आहे तीसुद्धा चीनची आहे. त्यात बसवण्यात आलेल्या चिप्सही चीनच्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे हस्तांतरित झाला आहे, असा गंभीर आरोप एचीएलचे सह-संस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे. ते एका टेक्नोलॉजी पह्रमशी बोलत होते. चौधरी यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थानात मॅन्युफॅक्चरिंगच्या नावाखाली केवळ काम केले जाते. आपल्याकडे सर्वकाही सामान हे चीनकडून येते. आपण केवळ त्याला असेंबल करतो. चीनमध्ये टेलिकॉमचे संपूर्ण काम हुवावे ही कंपनी पाहते. त्या ठिकाणी तेथील सरकारकडूनही त्या कंपनीला खूप फंडिंग दिले जाते. चीनमध्ये कंपन्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळते त्या तुलनेत हिंदुस्थानात कंपन्यांना मिळत नाही. हिंदुस्थानातील जास्तीत जास्त डेटा हा चीनकडे याआधीच पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे हस्तांतरित झाला आहे. आपल्याकडे ज्या सीसीटीव्ही पॅमेऱ्याचा वापर केला जातो. त्यात चीनची चिप आहे. आपल्याकडे डिझाईन क्षमता आहे. परंतु, मॅन्युफॅक्चरिंग क्षमता नाही. इलेक्ट्रॉनिक्ससाठी काही वर्षांपूर्वी काही युनिट स्थापन केले. परंतु, सेमिपंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आपण अजूनही शिकतच आहोत, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.































































