
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत 240 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर आता एअर इंडियाने मालक टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सकडे 1.1 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टच्या माहितीनुसार, ही फंडिंग कंपनी आपल्या सिस्टम्स, सर्विसेजला अपग्रेड करणे व इन हाऊस इंजिनीअरिंग आणि मेंटेनेंस डिव्हिजन बनवण्यासाठी खर्च करणार आहे. देशात अनेक एअरलाइन्स तोटा सहन करावा लागल्याने बंद झाल्या आहेत. इंडिगो ही एकमेक एअरलाइन कंपनी आहे, जी नफ्यात सुरू आहे. एअर इंडियामध्ये टाटा समूहाची 74.9 टक्के भागीदारी आहे, तर सिंगापूर एअरलाइन्सची 25.1 टक्के भागीदारी आहे. कंपनीला मिळणारी आर्थिक मदत दोन्ही मालकांच्या रेश्योच्या आधारावर दिली जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खर्चात वाढ
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने एअरस्पेसवर बंदी घातली आहे. यामुळे एअर इंडियाला पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. एअर इंडिया आता ज्या मार्गावरून जाते, त्यात अतिरिक्त इंधन लागते. तसेच ऑपरेटिंग खर्चही वाढला आहे. एअर इंडियाला 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे, असे एअर इंडियाचे सीईओ कँपबेल विल्सन यांनी म्हटले आहे.
महाराजाची केसरिया ऊद आणि अनमोल अगरबत्ती बाजारात
महाराजा अगरबत्तीची केसरिया ऊद आणि अनमोल प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया ऊद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल ऊद, हिना, पानडी, सुखद सँडल, पल्सर, बेला, कॉन्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवुड, स्वामी, ग्रीन मस्क, कस्तुरी आणि अनमोल अशा विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. संपर्क – 8369185071.
एसबीआय लाईफच्या ‘थँक्स-ए-डॉट’ उपक्रम
स्तनाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा एसबीआय लाईफच्या ‘थँक्स-ए-डॉट’ उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. ‘हग ऑफ लाईफ’ हा संदेश देणाऱया गरम पाण्याच्या 1,191 पिशव्या वापरून ‘थँक्स-ए-डॉट’च्या साहाय्याने स्तनांची स्वतःची तपासणी करा हा संदेश देणारा सर्वात मोठा मोझेक तयार केला. या वेळी एसबीआय लाईफचे सीईओ अमित झिंग्रान, अभिनेत्री महिमा चौधरी उपस्थित होते.
‘नो कॉन्स्टिपेशन’
डल्कोफ्लेक्स कंपनीने अद्वितीय मोहीम ‘नो कॉन्स्टिपेशन’ लाँच केली आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्यसंबंधित स्थिती ‘बद्धकोष्ठते’बाबत चर्चा सुरू करण्याचा आहे. या वेळी नुपूर गुरबक्षानी उपस्थित होत्या.
निथिया कॅपिटल
निथिया कॅपिटल आणि इव्होनिथ होल्डिंग्ज यांनी टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल्स लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केले. यासाठी कंपनीने 300 कोटी रुपये मोजले. ही निथिया कॅपिटलची स्टील मालमत्तेची तिसरी यशस्वी खरेदी आहे.
अपग्रॅडचा नफा
अपग्रॅड कंपनीने 1,943 कोटी रुपयांचा एकूण महसूल नोंदवला असून त्यात इंड-एएस अकाऊंटिंगनंतर एकूण उत्पन्न 1,650 कोटी रुपये नोंदवले गेले. आर्थिक वर्ष 24 मध्ये ईबीआयटीडीए तोटा 285 कोटी रुपये होता. त्यामुळे एक मोठा बदल झाला आहे.
वेब3 चा विस्तार
ब्लॉकचेन कंपनी बायनान्सने बायनान्स ब्लॉकचेनचा मुंबईत विस्तार केला. मुंबईतील सत्रात स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि ब्लॉकचेनप्रेमी एकत्र जमले होते. भारताची ब्लॉकचेन बाजारपेठ 2024 मध्ये 657 दशलक्ष डॉलर एवढी होती.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती कश्मिरी लव्हेंडर आणि अंगारे ऊद नॅचलर बेस अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतींपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805.
अॅरोकेम रतलामचा अल्कोहॉल फ्री डिओ
अॅरोकेम रतलाम प्रा. लि. ने अॅरो मॅगनेट अल्कोहोल फ्री डिओ नवीन पॅकमध्ये बाजारात आणले आहे. हा डिओ नावाप्रमाणेच अत्यंत पाणीदार, सी-ब्रीझ तसेच समुद्रासारखा सुगंध देणारा आहे. हा डिओ अत्यंत मनमोहक आहे. या डिओच्या 200 मिलीची किंमत 200 रुपये आहे. अॅरो मॅग्नेट हे इतर प्रकारचे उपलब्ध अल्कोहोल फ्री डिओ उपलब्ध आहेत. संपर्क – 07412-236226.
व्रेडिटबीची दिवाळी कॅम्पेन लाँच
ऑनलाइन व्रेडिट सोल्यूशन व्रेडिटबीने दिवाळी कॅम्पेन ‘हर तरक्की में साथ’ लाँच केला. या प्लॅटफॉर्मद्वारे एकूण 11,000 कोटी रुपये कर्ज वितरण झाले असून 70 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यात आली आहे. व्रेडिटबीने स्वतःला विश्वासार्ह अधोरेखित केले आहे. या मोहिमेत व्रेडिटबीचे पर्सनल लोन, टू-व्हीलर लोन, बिझनेस लोन या ऑफरिंग्ज दाखवल्या.































































