
मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि यूनाइटेड कूकी नेशनल आर्मीच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर विनाकारण गोळीबार केला, ज्यामुळे सुरक्षा दलांना प्रत्युत्तर द्यावे लागले. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली.
मणिपुरमध्ये बंदी घातलेल्या संघटनेशी यूनाइटेड कूकी नेशनल आर्मी जोडलेले होते. सुरक्षा रक्षकांना खानपी गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यामध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात चार अतिरेकींचा खात्मा करण्यात आला. मणिपुरमध्ये शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक कूकी आणि जोमी अतिरेकी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शांतता करार केला होता. मात्र करार केलेल्या संघटनांच्या यादीत यूनाइटेड कूकी नेशनल आर्मी चा समावेश नव्हता.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षक आणि अतिरेक्यामध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला तर अनेकजण जखमी झाले. तर अनेकजण बचाव करुन पळण्यात यशस्वी झाले. तिथून पळालेल्या अतिरेक्यांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.































































