कोल्हापुरात फडणवीसांवर ऊसफेक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकल्या! शेतकरी आक्रमक… फडणवीसांच्या भाषणावेळी घुसण्याचा प्रयत्न

ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा आणखी एक भडका उडाला असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी कोल्हापूर दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऊसफेकीचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शेतकऱयांनी उसाच्या कांडय़ा फेकल्या.

ऊसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. आज मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच बहुतांशी मंत्र्यांचा दौरा असल्याने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, पण विमानतळावरून कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अज्ञात शेतकऱयांनी उसाच्या कांडय़ा फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ ताफ्यासमोर पडलेल्या उसाच्या कांडय़ा बाजूला केल्या.

g दुसरीकडे एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण अंतिम टप्प्यात येताच एका शेतकऱयाने अचानक ‘डी’ झोनमध्ये घुसून मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज निघण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडत उचलून बाहेर नेले.