उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रॅक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने शेतकऱ्यांमध्ये शिवसेनेबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्या कर्जमाफीमुळे आपली एक एकर जमीन वाचलेल्या एका शेतकऱयाने आज प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल अत्यंत आदर व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी कुठेही बोलावले तरी आपण ट्रॅक्टर घेऊन तिथे जाऊ असे त्यांनी सांगितले.

या शेतकऱयाने महायुती सरकारबद्दल तीव्र संतापही व्यक्त केला अतिवृष्टीमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो, पण अजूनही पंचनामे झाले नाहीत. कोणतेही अधिकारी पाहणीसाठी आले नाहीत. पीक विम्याची तर थट्टाच करून ठेवली आहे. विम्याचे पैसे मिळाले; पण फक्त एक रुपया, सहा रुपये, सात रुपये, 29 रुपये असे पैसे आले. महायुती सरकारने शेतकऱयांची अक्षरशः चेष्टाच केली आहे. मी शिवसेनेचा माणूस नव्हतो, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळालेल्या कर्जमाफीनंतर आमची जमीन वाचली. आताच्या सरकारमध्ये ताळमेळच नाही. मुख्यमंत्रीम्हणतात पैसे आले दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो काय गरज आहे पैसे द्यायची तर तिसरे उपमुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे याबद्दल काहीच नाही. ज्यांनी यांना मोठं केलं पदावर बसवलं त्यांनाच यांनी धोका दिला तर आमच्या सारख्या गरीब शेतकऱयांचं काय असा खोचक सवालही या शेतकऱयाने केला. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मशाली शिवाय आम्ही कुठेही जाणार नाही आणि आमच्या तालुक्यात मशालच पेटेल असा विश्वासही या शेतकऱयाने व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही दिलेली मते कुठे गेली हे आम्हालाच कळत नाही असे म्हणत त्यांनी मतदानात घोटाळा झाल्याचेही संशय व्यक्त
केला.

आजचा दौरा

सकाळी 10 वाजता – करजखेडा, धाराशीव

सकाळी 11.30 वाजता – भुसणी, औसा

दुपारी 2 वाजता – थोरलेवाडी, अहमदपूर

सायंकाळी 4 वाजता – पार्डी, लोहा