
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांनी ही माहिती दिली. गोपाळ बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सेवेत होता.
डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे. त्याला अटक झाली असून, तो निलंबितही होता. दुर्वर्तन, विकृतपणे पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केला, असा ठपका ठेऊन त्याला बडतर्फ करण्यात आले.


























































