
हिंदुस्थानी वायुदलाच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त गुवाहाटीमधील ब्रम्हापुत्रा नदीजवळ हिंदुस्थानी वायुदलाच्या जवानांनी एअर शोची रंगीत तालीम केली. उद्या रविवारी एअर शोचे मुख्य आयोजन करण्यात आले आहे. या एअर शोला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, ईस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल सुरत सिंह यांची उपस्थिती राहणार आहे. या एअर शोमध्ये लढाऊ विमान राफेल, सुखोई-30, अपाचे, मिग-29, आयएल-78, मिराज, जॅग्वार, सी-17 ग्लोबमास्टर, एआय -17, अडव्हॉन्स्ड लाइट हेलिकाॅप्टर एमके-1, सी-130 हरक्युलिस, अँटोनोव एएन-32 आणि सूर्यकिरण टीम सहभागी होणार आहेत.

























































