यूआयडीएआयने आणले आधार डेटा वॉल्ट

हिंदुस्थानातील डिजिटल सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी यूआयडीएआयने एक नवीन पाऊल टाकले आहे. आधार नंबर आणि त्याच्याशी संबंधित ई-केवायसी डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी आधार डाटा वॉल्ट (एडीव्ही) हे फीचर लाँच केले आहे. हे आधुनिक डिजिटल स्टोरेज सिस्टम विशेष एन्क्रिप्शन टेक्नोलॉजीद्वारे संवेदनशील माहिती, चोरी आणि चुकीचा वापर होण्यापासून बचाव करेल. एडीव्हीमध्ये सर्व आधार नंबर टोकनायजेशनच्या माध्यमातून एन्क्रिप्टेड फॉर्म सुरक्षित असतील. यात खरा नंबर कुठेही लीक होणार नाही. केवळ अधिकृत एजन्सी मर्यादित या डेटापर्यंत पोहोचतील. आधार डेटा वॉल्टमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर्स सुरक्षित ठेवले जातील.

मॉनिटरिंग आणि ऑडिट ट्रेल्सच्या मदतीने डेटा सुरक्षाला आणखी मजबूत बनवण्यात आले आहे. बँक, फिनटेक कंपन्या आणि सरकारी संस्था, ज्या आधारद्वारे ओळख प्रक्रिया करतात. त्या याचा वापर करतील. याचा उद्देश हा आहे की, पर्सनल डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि डिजिटल फसवणुकीपासून बचाव करणे हा आहे.