
बऱयाचदा अचानक मानेवर चामखीळ दिसू लागते. याचा जास्त त्रास होत नसला तरी मानेवर हे चांगले दिसत नाही. मानेवरची चामखिळी दूर करायची असेल तर काही सोप्या टिप्स आहेत. चामखिळीवर केळ्याची साल लावून ठेवा. रात्रभर हा उपाय केल्याने चामखिळीचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होते. केळ्याप्रमाणेच बटाटादेखील चामखिळीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतो.
चामखिळी घालवण्यासाठी बटाटा किसून त्याची पेस्ट चामखिळीवर लावा. यामुळे झटपट चामखीळ कमी होण्यास मदत होते. चुन्यासोबत तूप समप्रमाणात मिसळा. हे मिश्रण चामखिळीवर लावा. यामुळे चामखिळीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. जर एखाद्या व्यक्तीची त्वचा संवेदनशील असेल तर त्यांनी घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

























































