सेबीचा इशारा… डिजिटल गोल्डपासून सावध रहा

‘डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्डमध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती करून मगच गुंतवणूक करा. कारण डिजिटल गोल्डच्या अनेक स्कीम नियमनाच्या बाहेर असून त्यात प्रचंड मोठी जोखीम आहे, असा सावधानतेचा इशारा बाजार नियामक संस्था सेबीने (सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) गुंतवणूकदारांना दिला आहे. म्युच्युअल फंडांकडून ऑफर केले जाणारे गोल्ड ईटीएफ, कमॉडिटी मार्केट आणि स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होणारे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स हे सोन्यात गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय आहेत, असेही सेबीने म्हटले आहे.