
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या संख्येच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाला 20 स्टार प्रचारकांची यादी द्यावी लागत होती, आता स्टार प्रचारकांची संख्या 40 इतकी करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची घोषणा अपेक्षित आहे. या निवडणुकीत स्टार प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 इतकी करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या निर्णयानुसार राजकीय पक्षांना स्टार प्रचारकांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागणार आहे.


























































