
कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केलं होतं. यावरूनच आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विखे पाटील यांना चांगलेच सुनावलं आहे. विखे पाटील यांच्या नावालनं फेसबुकवर एक पोस्ट करत राजू शेट्टी म्हणाले आहेत की, “१९८० साली शरद जोशींनी ऊसाला प्रतिटन ३०० रूपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केलं होतं.”
राजू शेट्टी म्हणाले की, ” त्याच वडिलांचं इंजिनिअरिंग कॅालेज तुम्ही आज चालवताय. त्यामध्ये इंजिनीअंरिगच्या विद्यार्थ्याला ४.५० लाख रूपये फी घेताय व त्याच वडीलांच्या साखर कारखाना तुम्ही चालविताय. त्यामध्ये आज ऊसाला प्रतिटन ३ हजार दर देताय.”
ते म्हणाले, “इंजिनिअरिंग कॅालेजच्या फीप्रमाणे ऊस दर वाढविला असता तर आज उसाला ३० हजार रुपये दर मिळाला असता. मग आमचच कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेल कर्ज सुद्धा आम्हीच फेडल असतं.”





























































