
केरळ राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी स्थानिक निवडणुकीची घोषणा केली. राज्यात 9 आणि 11 डिसेंबरला दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथित्ता, कोट्टायम, अलप्पुझा, इदुक्की आणि एर्नापुलम जिह्यांत मतदान पार पडेल, तर दुसऱ्या टप्प्यात त्रिशूर, पलक्कड़, मलप्पुरम, वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिह्यांत मतदान घेतले जाईल. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 21 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची तारीख 24 नोव्हेंबर आहे. या निवडणुकीचा निकाल 13 डिसेंबरला जाहीर केला जाईल.

























































