
ज्येष्ठ अभिनेते आणि प्रभावी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम चोपडा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे प्रेम चोपडा यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. वाढत्या वयामुळे प्रकृती अस्वास्थ असून चिंता करण्याचं कारण नाही, असंही सांगण्यात आले आहे.
प्रेम चोपडा 90 वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की वयोमानामुळे येणाऱ्या या समस्या आहेत, त्यांना नियमित चेकअपसाठी रुग्णालयात आणलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम चोपडा यांनी ‘उपकार’, ‘बॉबी’, ‘दो अनजाने’, ‘क्रांती’ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. प्रेम चोपडा यांनी तब्बल 60 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. त्यांनी तब्बल 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2023 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.



























































