
भरधाव वेगातील डंपरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. निखिल कढरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सुमित खैरनार आणि निखिल हे शनिवारी रात्री मालाड येथे गेले होते. तेथून परत येताना पठाणवाडी ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवरून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. त्या धडकेत निखिल हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

























































