
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याचे मतदान उद्या होत आहे. राज्यातील 20 जिह्यांतील 122 मतदारसंघातील 1,302 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम चंपारण, मधुबनी, सितामढी, शोहर, सपौल, अरारिया, किशनगंज, पुर्णिया, कटिहार, भागलपूर, बंका, गया, औरंगाबाद, जहानाबाद, अरवाल, जमुई, नवादा, रोहतास आणि पैमूर जिह्यातील मतदारसंघांचा यात समावेश आहे. या टप्प्यात एकूण 45,399 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुमारे 4 लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
शुक्रवारी निकाल
या निवडणुकीचे निकाल शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी मतदान संपल्यानंतर सात वाजता विविध वृत्तवाहिन्या व संस्थांचे एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.




























































