
भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदांकरिता नेमणूका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहे. या मुलाखती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिवसेना शाखा क्र. 115, सह्याद्री नगर, भांडुप पश्चिम येथे होणार आहेत.
युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रीय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.





























































