निवृत्त नौसैनिकाची फसवणूक

कुरिअर ट्रक करण्याच्या नावाखाली ठगाने हिंदुस्थानी नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पवईत राहणाऱ्या निवृत्त नौदलातील अधिकारी यांनी एका कुरिअर कंपनीच्या नंबरवर त्याने फोन केला. त्यावेळी ठगाने त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक फाईल पाठवून एक अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्या अ‍ॅप्समध्ये ज्याना कुरिअर पाठवायचे आहे त्याचे नाव आणि पत्ता त्यात अपलोड करण्यास सांगितले. तसेच सर्व्हिस चार्ज म्हणून क्रेडिट कार्डचे तपशील टाकण्यास सांगितले. त्यानंतर खात्यातून पैसे गेल्याचा त्यांना मेसेज आला. कोणताही ओटीपी न देताच पैसे गेल्याने त्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली.