
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 21 जानेवारी 2026 ला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू होते. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनावणीची बतावणी सुरु आहे. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल ह्यावर आमचा आजही विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा निकाल लागेल, यावर आमचा विश्वास आहे, असे सांगत त्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह्याबाबतच्या सुनावणीला तारीख पे तारीख देण्यात येत आहे, यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार मिळणाऱ्या तारखांमुळे निकालास विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनता हे प्रकरण विसरण्यापूर्वीच त्याचा निकाल लागेल यावर माझा ठाम विश्वास आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.
सुनावणीची बतावणी सुरु आहे. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल ह्यावर आमचा आजही विश्वास आहे. pic.twitter.com/cBMkWEVR45
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 12, 2025
यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून तुम्ही यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला हवी व त्यासाठी आम्हाला दोन तास लागतील असे आम्ही न्यायालयाला सांगितले. परंतू न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी 21 जानेवारीची तारीख दिलीय ती आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, असे ते म्हणाले.




























































