
दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असताना वाराणसी येथे जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई येथून वाराणसीला जाणारे हे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान होते. मात्र, ही धमकी अफवा ठरली. विमानाचे वाराणसी येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तेथे सर्व प्रोटोकॉलचे पालन करत विमानाची कसून तपासणी करण्यात आली. कोलकाता एटीसीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही धमकी मिळाली होती.

























































