
भाईंदरकरांची कचऱ्याच्य प्रचंड दुर्गंधीतून लवकरच सुटका होणार आहे. महापालिकेने भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे असलेल्या घनकचरा प्रकल्पात बायोमायनिंग प्रक्रियेला सुरुवात केली असून पावसाळ्यापर्यंत संपूर्ण कचरा प्रक्रिया करून नष्ट केला जाणार आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्पावरून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील धावगी डोंगरावर घनकचरा प्रकल्प सुरू आहे. या घनकचरा प्रकल्पामध्ये गेल्या १२ वर्षांपासून समारे १० टनांपेक्षा जास्त कचरा साठून राहिला आहे. हा कचरा साठून राहिल्यामुळे रहिवाशांना दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. या साठलेल्या कचऱ्याला वारंवार आग लागत असल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. या धुरामुळे प्रदूषण हवेत पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे उत्तन परिसरातील रहिवाशांना कॅन्सर, फुप्फुस, दमा यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे घनकचरा प्रकल्प येथून हटवावा यासाठी स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा आंदोलनेदेखील केली

























































