
भेगा पडलेल्या टाचा ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. यामुळे पायाचं सौंदर्य तर बिघडतं शिवाय, त्या भेगांमधून रक्त आल्यामुळे वेदनाही होतात. याबरोबरीने इन्फेक्शनची भीतीही असते. पायांना पडलेल्या वेदनांमुळे अनेकदा झोपही येत नाही. म्हणूनच काही परवडणारे घरगुती उपचार करणे हे गरजेचे आहे.
पायावरील भेंगावर घरगुती उपचार
कांद्याची पेस्ट
कांद्याची पेस्ट पायांना लावणे हा एक पायांवरील भेगांवर रामबाण उपाय आहे. याकरता २ छोटे कांदे, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडी हळद गरजेची आहे.
कांद्याची पेस्ट कशी बनवाल?
कांदा स्वच्छ करून किसून घ्या. किसलेल्या कांद्यामध्ये बेकिंग सोडा, मीठ, लिंबाचा रस आणि हळद घालावी. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. ही पेस्ट किमान पंधरा ते वीस मिनिटे भेगा पडलेल्या टाचांवर लावावी. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावे.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा च्यवनप्राश, वाचा
शॅम्पू पेस्ट
टाचांना मऊ मुलायम ठेवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. याकरता १ शॅम्पू पाऊच (कोणताही ब्रँड), १ चमचा बेकिंग सोडा, १/२ चमचा मीठ आणि १/२ लिंबाचा रस.
कसे तयार कराल?
शॅम्पू एका भांड्यात घ्यावा. बेकिंग सोडा, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिसळवावा. ही पेस्ट १० मिनिटे भेगा पडलेल्या टाचांवर लावा. नंतर कोमट पाण्याने पाय धुवा.
आठवड्यातून किमान तीन वेळा हे उपाय पुन्हा करा. भेगा पडलेल्या टाचांपासून पूर्णपणे मुक्ती मिळे. तसेच पायही मऊ मुलायम होतील. कोमट पाण्याने पाय धुण्याने टाचा मऊ होण्यास मदत मिळते.



























































