
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 2026 सालच्या दिनदर्शिकेसाठी आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यात दै. ‘सामना’चे छायाचित्रकार संदीप पागडे यांच्या छायाचित्राची देखील निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेत त्यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात येणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित या स्पर्धेसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 314 छायाचित्रे परीक्षणासाठी प्राप्त झाली होती. विविधतेने नटलेल्या मुंबईच्या जीवन, संस्कृती आणि सौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांमधून 12 महिन्यांच्या संकल्पनेनुसार सर्वोत्तम 12 छायाचित्रांची निवड दिनदर्शिकेसाठी करण्यात आली आहे.


























































