
शनिवारी मध्यरात्री राजापूर शहरातील भटाळी परीसरात एक बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. हा बिबट्या लगत असलेल्या पोलीस वसाहतीकडून येताना दिसला आणि तो आरामात जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. परीसरात अनेक वेळा बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले आहे. शिवाय शहराच्या विविध परीसरात रात्री अपरात्रीच नव्हे तर भर दिवसा देखील बिबट्याला पहिल्याचे नागरिक सांगतात.
यापूर्वी राजापूर पोलीस ठाण्यातून बिबटया एका कुत्र्याला घेऊन जाताना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले होते. त्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण त्यावेळी पसरले होते. गेले काही दिवस शहरात बिबट्या फिरत असल्याने नागरिक धस्तावले आहेत. शहरात फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त केला जावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनातून केली जात आहे.




























































