
ऑक्टोबरमध्ये देशाची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्यावर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 30.57 टक्क्यांनी घसरून सुमारे 19172 कोटी रुपयांवर आली. ऑक्टोबर 2024 मध्ये या क्षेत्राची एकूण निर्यात 26237 कोटी रुपये एवढी होती. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने ही माहिती दिली.
ऑक्टोबरमध्ये कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत 26.97 टक्क्यांनी घट होऊन ती 9,071.41 कोटी रुपयांची झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीत ती 11,806.45 कोटी रुपयांची झाली होती. पॉलिश केलेल्या प्रयोगशाळेत उत्पादित केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातही 34.90 टक्क्यांनी कमी होऊन मागील वर्षीच्या याच महिन्यातील 1,218.25 कोटी रुपयांवरून 834.45 कोटी रुपयांवर आली.
सोन्याच्या दागिन्यांची निर्यातही 28.4 टक्क्यांनी घसरून 7,520.34 कोटी रुपयांवर आली. मागील वर्षीच्या याच कालावधीत 9,975.17 कोटी रुपयांची निर्यात झाली होती.
ऑक्टोबरमध्ये चांदीच्या दागिन्यांची निर्यात 16 टक्क्यांनी घसरून 1,072.81 कोटी रुपयांची झाली, आर्थिक वर्ष 2024 च्या याच कालावधीत ती 1,219.01 कोटी रुपयाची होती.
त्याचप्रमाणे, एप्रिल-ऑक्टोबर या सहामाही कालावधीत रंगीत रत्नांची निर्यात 3.21 टक्क्यांनी घसरून 2,173.08 कोटी रुपयांवर आली. मागील वर्षी याच कालावधीत ती 2,163.52 कोटी रुपयांची होती.

























































