जिजामाता नगर गणेशोत्सव मंडळातर्फे महाआरोग्य शिबीर

काळाचौकी येथील जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्या हस्ते विभागातील रुग्ण नागरिकांना व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि वॉकर या वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना माजी नगरसेवक सचिन पडवळ, समाजसेवक डॉ. प्रागजी वाजा उपस्थित होते. मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. महाआरोग्य शिबिरात जवळपास 500 नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गुरव, सरचिटणीस संतोष तानवडे, खजिनदार महेंद्र जाधव यांनी दिली.