
भरधाव कार लग्नाच्या वरातीत घुसल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघातात तीन वऱ्ह्यांड्याचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गावात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
बेतिया-बगाल राष्ट्रीय महामार्गावरील बिशुनुरवा गावाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अनियंत्रित कार लग्नाच्या वरातीत घुसली आणि अनेकांना चिरडत गेली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.






















































