
तारापूर एमआयडीसीतील विराज कंपनीत आज लोखंडी रॉड डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. परेश राठोड (32) असे या दुर्दैवी कामगाराचे नाव असून या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तारापूर एमआयडीसीतील स्टीलनिर्मिती करणाऱ्या विराज कंपनीत महिनाभरापूर्वी गरम धातू गळतीची भीषण घटना घडली होती. या दुर्घटनेत चार कामगार होरपळले होते. यातील दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच कंपनीतील एसएमएस प्लांटमध्ये काम करणाऱ्या परेश राठोड याच्या डोक्यात अचानक लोखंडी रॉड कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




























































