
कडधान्यामध्ये चणे भिजत घातल्यानंतर आपण त्याची उसळ बनवण्यासाठी चणे उकडून घेतो. उकडून झाल्यानंतर चण्याचे जे पाणी राहते त्याचे काय करावे असा प्रश्न पडतो. उकडून राहिलेले चण्याचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे.
चणे उकडून राहिलेल्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि विविध पोषक तत्वे असतात. चणे उकडल्यावर अनेक आवश्यक पोषक तत्वे पाण्यात विरघळतात. हे पाणी शरीराला ऊर्जा प्रदान करू शकते आणि अनेक किरकोळ समस्यांमध्ये मदत करू शकते.
रिकाम्या पोटी उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे फायदे
चण्याच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला बळकटी देतात. यामुळे दिवसभराचा थकवा कमी होतो आणि तुम्हाला सक्रिय वाटते.
आहारतज्ज्ञांच्या मते, चण्याच्या पाण्यात असे घटक असतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात. हे पाणी पिल्याने हिवाळ्यात वारंवार खोकला आणि सर्दी होण्यास प्रतिबंध होतो.
या पाण्यातील पोषक तत्वे तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करू शकतात. अँटिऑक्सिडंट्स तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
चण्याच्या पाण्यात लोह असते, जे डोळ्यांसाठी आवश्यक पोषक तत्व असते. हे निरोगी दृष्टी राखण्यास मदत करते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी चण्याचे पाणी देखील फायदेशीर मानले जाते. ते पोट हलके आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टीक खजिना असलेले हे गाजराचे सूप करुन बघायलाच हवे, वाचा
चण्याचे पाणी कसे प्यावे?
यासाठी चणे उकडल्यानंतर उरलेले पाणी एका ग्लासमध्ये ओता.
थोडे लिंबू, मीठ आणि मिरपूड घाला.
सर्व काही चांगले मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.
हे पेय पिण्यास केवळ स्वादिष्टच नाही तर हळूहळू तुम्हाला अनेक फायदे देखील देईल.



























































