केरळमध्ये BLO ने उचलले टोकाचे पाऊल, कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकल्याने संपूर्ण SIR प्रक्रिया ठप्प

केरळमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) यांनी कामावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्यातील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली, आहे. कन्नूर जिल्ह्यातील पय्यन्नूर येथे 44 वर्षीय BLO अनीश जॉर्ज यांनी कथितपणे कामाच्या अत्याधिक दडपणामुळे आत्महत्या केली. रविवारी ते आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरोप केला की प्रचंड कामाचा ताण आणि SIR संबंधित दडपणामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

अनीश जॉर्ज यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आणि नंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबियांनी पुन्हा सांगितले की SIR संबंधित तणावच त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले. त्यांच्या मेहुणे सैजू यांनी सांगितले की अनीश यांना नीट जेवायलाही आणि झोपायलाही वेळ मिळत नव्हता. वरिष्ठ अधिकारी सतत फोन करून अपडेट मागत असत. अनेकदा वडिलांनी त्यांना म्हटले होते की नोकरी गेली तरी काही हरकत नाही, पण अनीश यांच्यावरचा ताण वाढतच गेला.

अनीश यांच्या मृत्यूनंतर राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी आंदोलन छेडले. राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षक ॲक्शन कौन्सिल, टीचर सर्व्हिस ऑर्गनायझेशनची संयुक्त समिती आणि NGO असोसिएशन यांनी तिरुवनंतपुरम येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निषेध नोंदवला. पीटीआयच्या माहितीनुसार, संघटनांची मागणी आहे की SIR प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि BLO वरचा अनावश्यक ताण दूर करावा, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.

सभागृहातील विरोधीपक्षनेते वी. डी. सथीसन यांनी मोठा आरोप केला की प्राथमिक तपासात माकप कार्यकर्त्यांचाही या प्रकरणात काही रोल असण्याची शक्यता दिसते. त्यांचा दावा आहे की अनीश यांना धमक्या दिल्या गेल्या, जेव्हा ते मतदार यादीसाठी काँग्रेसच्या एका बूथ एजंटसोबत गेले होते. सथीसन यांनी आरोप केला की भाजप आणि माकप दोघेही काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना यादीतून वगळण्यासाठी कट रचत आहेत. त्यांनी SIR प्रक्रियेची कडाडून टीका केली आणि या प्रक्रियेला राजकीय हेतूंनी प्रेरित म्हटले.

काँग्रेस नेते सनी जोसेफ यांनीही दावा केला की अनीश यांच्या एका फोन संभाषणातून स्पष्ट होते की माकप कार्यकर्त्यांनी त्यांना धमकावले होते. कथित संभाषणात असे म्हटले गेले होते की अनीश यांनी काँग्रेसची पत्रके वाटल्याचा खोटा आरोप करण्याची धमकी त्यांना दिली गेली. जोसेफ यांच्या मते, प्रचंड कामाच्या ओझ्याबरोबरच हा राजकीय दबावही त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला. काँग्रेसने BLO च्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला असून SIR प्रक्रियेविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणाही केली आहे.