
टोमॅटो ही फक्त एक भाजी नाही. तर टोमॅटोचे असंख्य फायदे आहेत. यातील मुख्य फायदा म्हणजे टोमॅटो त्वचेसाठी देखील प्रभावी आहेत. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. तसेच चेहरा चमकदार हवा असेल तर टोमॅटोचा वापर करायला हवा. टोमॅटोचा वापर केवळ तुमची त्वचा उजळवण्यासाठीच नाही तर ते डाग कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते. टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील डाग दूर होते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.
टोमॅटो फेस पॅक कसा कराल?
त्वचा उजळवण्यासाठी टोमॅटोचा फेस पॅक बनवणे सर्वात महत्त्वाचे आहे. याकरता टोमॅटो बारीक करा आणि त्याचा रस काढा.
१ चमचा दही किंवा मध घालावे. सर्व मिश्रण व्यवस्थित चांगले मिसळवावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.
१५-२० मिनिटांनी चेहरा धुवावा. या फेस पॅकमुळे त्वचा मऊ मुलायम बनते.
टोमॅटो फेस स्क्रब
टोमॅटोचा वापर स्क्रब म्हणून देखील करता येतो. टोमॅटो फेस स्क्रब बनवण्यासाठी टोमॅटोचा लगदा घ्यावा. त्यात बेसन किंवा थोडी साखर मिसळावी. याने चेहऱ्यावर मसाज करावा. २० मिनिटांनी पाण्याने धुवावे, यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यास मदत होते.




























































