
भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला मिंधे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आक्षेप घेतला असून नाईकांच्या जनता दरबारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हायकोर्टाने याचिकेची आज दखल घेत याचिकाकर्त्या जिल्हाप्रमुखालाच सुनावले.
मंत्र्यांना जनता दरबार घेऊ नका हे आम्ही सांगायचे का? याउलट तुम्हीच त्यांना जनता दरबार घेऊ नका असे का सांगत नाही, असे फटकारत न्यायमूर्तींनी तूर्तास यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. नाईक यांना ठाणे जिह्यात जनता दरबार घेण्याचा अधिकार नसतानासुद्धा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व इतर ठिकाणी जनता दरबार घेत असल्याचा आरोप करत मिंधे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.





























































