
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टय़ांची दुरुस्ती 20 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असे सहा तास विमानतळ बंद राहणार आहे. विमानतळ बंद राहण्याच्या कालावधीबाबत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच विविध विमान कंपन्यांना याबाबत माहिती दिली आहे.





























































