
अॅपल कंपनीने युजर्ससाठी आयओएस 26.2 चा तिसरा डेव्हलपर बीटा लाँच केले. हे अपडेट केल्यानंतर युजर्सला नवीन फीचर्स मिळणार आहेत. यामुळे आयफोन आणखी पॉवरफुल बनला आहे. या नव्या अपडेटमध्ये एअर ड्रॉपपासून गेम्स अॅप, रिमाइंडर्स, हेल्थ इंटिग्रेशन आणि आयपॅडचे मल्टिटास्किंग सिस्टमपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. प्रत्येक नव्या बीटासोबत कंपनी त्या फीचर्सला अॅक्टिव करत आहे. जे सुरुवातीच्या बिल्डमध्ये नव्हते. तसेच ज्या काही किरकोळ समस्या युजर्सला येत होत्या, त्यासुद्धा आता फिक्स करण्यात आल्या आहेत. एअर ड्रॉप कोड फीचरमुळे युजर्स आता एक वन टाइम कोड जनरेट करू शकतील. यामुळे कोणत्याही नॉन कॉन्टॅक्ट व्यक्तीला 30 दिवसांपर्यंत फाइल पाठवू शकता येईल किंवा प्राप्त करता येईल.
अॅपलने हेल्थ सिस्टमला आणखी मजबूत केले आहे. नवीन एपीआय आता थर्ड पार्टी अॅपला अॅपल वॉचकडून पाठवलेल्या हाय ब्लड प्रेशर अलर्टला परवानगी देते. बीटा 3 इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सला अॅपल अकाऊंट डेटाचा वापर करण्यासाठी नवीन प्रायव्हसी प्रॉम्पट दिसेल. हे एक नियमित रुटीन अपडेट आहे.



























































