
हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मॉस्कोत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत-रशिया शिखर संमेलनाच्या तयारीची माहिती दिली. या भेटीची माहिती जयशंकर यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. पुतीन हे डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जयशंकर हे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्राध्यक्ष परिषदेसाठी मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. या बैठकीला इराणचे उपराष्ट्रपती, बेलारूसचे पंतप्रधान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, पाकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित होते.

























































