प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ मुलांसाठी किती घातक? लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र या खाद्यपदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होतात. द लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे काय धोका निर्माण होतो याचे धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक रोगांचा धोका वाढतो.

प्रोसेस खाद्यपदार्थांबाबत सार्वजनिक मोहीम आवश्यक आहे. आहार सुधारणे केवळ ग्राहकांच्या वर्तनात बदल करण्यावर अवलंबून नाही तर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे उत्पादन, परिसंचरण आणि वापर कमी करण्यासाठी नवीन धोरणे विकसित करण्यावर देखील अवलंबून आहे. हे पॅकेज केलेले अन्न टिकवण्यासाठी विविध रसायनांचा वापर करतात.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आपल्या आरोग्याला धोका निर्माण करतात. 43 जागतिक तज्ञ आणि द लॅन्सेटच्या अहवालानुसार, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे गंभीर आजारांचा धोक वाढतो. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चरबी, साखर आणि मीठ जास्त असते. त्यात स्टेबिलायझर्स, इमल्सीफायर्स, कलरंट्स आणि फ्लेवरिंग्जसारखे हानिकारक घटक असतात. केमिकलमुळे हे पदार्थ अनेक महिने टिकतात. असंख्य अहवालांमधून असे दिसून आले आहे की, हे पदार्थ केवळ लठ्ठपणा वाढवत नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतात. अहवालात म्हटले आहे की, किरकोळ दुकानांमध्येही स्नॅक्स, नूडल्स, बिस्किटे आणि साखरेचे पदार्थ उपलब्ध आहेत जे पचनसंस्थेला हानी पोहोचवतात.