चिप्स खाल्यानंतर काही वेळात 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलं?

चिप्स खाल्यानंतर चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिप्सच्या पॅकेटमधील छोटे खेळणे चिप्ससोबत मुलाने गिळल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील मुसीमाहा गावात ही घटना घडली.

चार वर्षाच्या चिमुकला नेहमीप्रमाणे अंगणवाडीतून घरी आल्यानंतर वडिलांनी त्याला चिप्स खायला दिले. चिप्सच्या पॅकेटमध्ये असलेले छोटे प्लॅस्टिकचे खेळणेही मुलाने चिप्ससोबत गिळले. खेळणे श्वसननलिकेत अडकल्यामुळे त्याचा श्वास अडकला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ डेरिंगबाडी सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.