
इंडोनेशियातील जावा द्विपवर असलेले सर्वात उंच ज्वालामुखी माऊंट सेमेरू येथे अचानक स्फोट झाला. यानंतर या परिसरात असलेल्या अडकलेल्या 178 नागरिकांना वाचवण्यात यश आले. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. हे सर्व लोक रानू कुम्बोलो नावाच्या कॅम्पिंग परिसरात थांबले होते. माऊंट सेमेरूमध्ये स्फोट झाल्यानंतर 13 किलोमीटरपर्यंत गरम राख पसरली.




























































