
इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानात लाँच केलेल्या टेस्लाच्या वाय मॉडेल कारला सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. यामुळे टेस्लाची या इलेक्ट्रिक कारची डिमांड वाढू शकते. इरो एनसीएपीच्या चाचणीत टेस्ला मॉडल वायला लेफ्ट हँड ड्राइव्ह, ड्युअल मोटर एडब्ल्यूडी कॉन्फिगरेशनसोबत कार आणली आहे. टेस्लाने हिंदुस्थानात वाय मॉडेलचे दोन व्हर्जन लाँच केले आहेत. पहिल्या व्हर्जनची किंमत 59.9 लाख रुपये, तर दुसऱ्या व्हर्जनची किंमत 67.9 लाख रुपये आहे. टेस्लाच्या या कारमध्ये 10 एअरबॅग दिल्या आहेत. या इलेक्ट्रिक कारमध्ये आयएसओफिक्स जोडले आहे.


























































